Monday, 31 December 2012

येणार्‍या काळात शेती हाच पर्याय- शरद जोशी


"लोकमत"


(31-12-2012 : 00:37:54)

चंद्रपूर। दि. ३० (शहर प्रतिनिधी)
... खेड्यात आज ४७ टक्के लोकसंख्या उरली आहे. खेड्यातील युवकांचा कल शहराकडे आहे. अशा अवस्थेमध्ये येणार्‍या १० वर्षात रोजगार म्हणून शेतीकडेच वळावे लागेल, कारण तोच पर्याय शिल्लक उरणार आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार शरद जोशी यांनी केले.
येथील शुभम मंगल कार्यालयात शेतकरी संघटनेची दोन दिवशीय महाराष्ट्र राज्य संयुक्त कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचा आज समारोप होता. याप्रसंगी ते बोलत होते.

स्वतंत्र भारत पक्षाचे प्रातांध्यक्ष व माजी आमदार अँड. वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष रवी देवांग, शेतकरी महिला आघाडीच्या शैलजा देशपांडे, माजी आमदार सरोजताई काशिकर, अनिल धनवट, संजय कोले उपस्थित होते. शेतमालाला रास्त भाव व व्यवस्थापरिवर्तनाची लढाई या बाबींना अनुसरून चंद्रपूर येथे ८,९ व १0 नोव्हेंबर २0१३ या कालावधीत राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत शरद जोशी पुढे म्हणाले, कापसाचे प्रचंड उत्पादन असताना आणि भूगर्भात खनिज संपती असतानाही विदर्भावर सतत अन्याय झाला आहे. विदर्भावरील अन्याय दूर करायचा असेल तर वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाही. महिला संरक्षणाचा सध्या ऐरणीवर आलेल्या मुद्याचा संदर्भ देऊन ते म्हणाले, सध्या कायद्यातील तरतुदी व अपराध्यांना शिक्षा यात समन्वय नसल्याने परिणामकारक शिक्षा शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. या बैठकीत देशातील सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीचा सांगोपांग आढावा घेऊन आगामी कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात आली. यावेळी रंगराजन समितीच्या अहवालावरही चर्चा करण्यात आली. हा अहवाल लागू करण्यासाठी शासनावर दबाव टाकण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

यावेळी अँड. वामनराव चटप, रवी देवांग, सरोज काशिकर, शैलजा देशपांडे, संजय कोले, अनिल धनवट, गुणवंत हंगर्णेकर, अनिल ठाकूरवार, गंगाधर मुटे, विलास मोरे, दिलीप भोयर, अँड. दिनेश शर्मा, प्रभाकर दिवे, रसिका उलमाले यांनीही आपली मते मांडली. या बैठकीत एफडीआयविषयी माहिती देण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले.
--------------------------------------------------------------------------
See More
 

Wednesday, 26 December 2012

Sharad Joshi

Wednesday, June 10, 2009

Sharad Joshi

Agriculturist/Farmer: An articulate spokesman of the new Farmers’ Movement. Founder of Shetkari Sanghatana Peasants' Organisation in Maharashtra and at national level, of the Kisan Coordination Committee (KCC) comprising of sister organizations from 14 States. Led a number of mass agitations in Maharashtra, Karnataka, Gujarat, Punjab, Haryana etc. for remunerative prices of onions, sugar cane, tobacco, milk, paddy, cotton, against hike in electricity tariffs, for liquidation of rural debts and against State dumping in domestic markets. Original and persistant propounder of the postulate that the Government imposed negative subsidies on farmers as a matter of deliberate policy which has, since, been vindicated.
Economist: Lecturer in Economics and Statistics, University of Poona, 1957-58. Opposed to all subsidies and militates towards non-intervention by the State in the Economy, particularly in the commodity markets.
Writer/Journalist: An accomplished writer and scholar. Member of the Hindi Salahakar Samiti, Rajya Sabha Secretariat. Author of several books in Marathi, Hindi and English. Columnist in The Times of India, The Hindu, Lokmat, the Hindu Business Line and severel other dailies in Marathi etc.
POSITIONS HELD
May 2008 onwards Member, Committee on Public Undertakings
February 2007 onwards Member, Expert Committee on Futures Markets
May 2006 onwards Member, Indian Council of Agricultural Research Society
December 2005 onwards Member, Committee on Rules
October 2005 onwards Permanent Special Invitee, Consultative Committee for the Ministry of Agriculture and Ministry of Consumer Affairs, Food and Public Distribution
2005 onwards Member, Parliamentary Forum on Water Conservation and Management
August 2005 onwards Member, National Oilseeds and Vegetable Oils Development (NOVOD) Board Sept.
July 2005 onwards Member, Hindi Salahakar Samiti, Rajya Sabha Secretariat
May 2005 - April 2008 Member, Committee on the Welfare of Scheduled Castes and Scheduled Tribes
October 2004 onwards Member, Consultative Committee for the Ministry of Commerce and Industry
August 2004 onwards Member, Committee on Agriculture
July 2004 elected to Rajya Sabha
2000-01 Chairman, Task Force on Agriculture (rank of Cabinet Minister)
1989-91 Chairman, Standing Advisory Committee on Agriculture (rank of Cabinet Minister)
The Indian Postal Service as Class I Officer, 1958-67
Lecturer in Economics, College of Commerce, Kolhapur, Pune University, 1957-58


SOCIAL & CULTURAL ACTIVITIES, LITERARY, ARTISTIC & SCIENTIFIC ACCOMPLISHMENTS AND OTHER SPECIAL INTERESTS
Undertook Narmada Parikrama to understand problems of displaced farmers in Narmada Valley
Initiated and implemented programmes to generate awareness in Narmada region and sensitize them for creating pro-dam environment
Involved in massive social exercise to educate farmers on benefits derived after signing the WTO
Been working towards creating an amicable social mindset for women's share in properties in Maharashtra


OTHER INFORMATION

Awards & FelicitationsØ C. E. Randle Gold Medal for Banking in B. Com. Examination, 1955
Ø Kursetjee Dady Prize for the thesis "River Valley Projects and their consequences for the economic development of India", 1957

Founder
Ø Shetakari Sanghatana, a farmers' organization in Maharashtra in 1978
Ø Shetakari Mahila Aghadi, a women farmers' organization which is a leading movement for womens' property rights and
Ø Kissan Coordination Committee, the only national umbrella organisation of farmers

Founder & National PresidentØ Swatantra Bharat Paksha - the only liberal party and successor of C. Rajagopalachari's Swatantra Party; led several agitations for remunerative prices of farm/agriculture produce, fair electricity tariffs and write-off of loans


Member
Ø Advisory Board, World Agriculture Forum, U.S.A. since 1999
Ø Parliamentary Committee on the Restoration of Democracy in Myanmar
Ø Governing Body of the Indian Council of Agricultural Research (ICAR)
Ø Steering Committee of the GEF-World Bank Project on Capacity Building on Bio Safety
Ø Parliamentary Network on the World Bank, the Indian National Group
Ø Advisory Committee on the Use of Hindi in the Department of Posts
Ø District Telephone Advisory Committee, Pune District, Maharashtra
Ø Railway Zonal Advisory Committee of the Central Railways
Ø Chef de service d'informatique, International Bureau Universal Postal Union, Bern, 1968-77


BOOKS PUBLISHED
In Marathi
Ø Swatantrya Ka Nasley, 1998, originally in Marathi and translated into Hindi - Azadi Nakam Kyon Rahi, 2001
Ø Beijing Parishadecha Arth Ani Ishara, 1996
Ø Maharashtra Shasanache Mahila Dhoran : Dalbhadri Chindhi, 1994,
Ø Rashtriya Krishi Niti, 1991
Ø Jatiyavadacha Bhasmasur, 1989
Ø Shetakryancha Raja Shivaji, 1988
Ø Shetkari Kamgar Paksha - Ek Avalokan, 1987
Ø Chandvadachi Shedori, 1986
Ø Prachalit Arthvyavasthevar Nava Prakash-Part I, 1982
Ø Prachalit Arthvyavasthevar Nava Prakash-Part II, 1985
Ø Bheek Nako, Have Ghamache Daam, 1984
Ø Shetakaryacha Asood - Shatakacha Mujara, 1984
Ø Shetkari Sanghataneche Arthshastra - Khandan Mandan, 1983
Ø Bharatiya Shetichi Paradhinata, 1982
Ø Shetkari Sanghatana - Vichar Aani Karypaddhatti, 1982, with translations in Hindi, Gujarati, Kannada and Telugu

In HindiØ Samasyayen Bharat Ki, 1988

In English

Ø Answering before God, 1994
Ø Bharat Eye-view, 1988
Ø The Womens' Question, 1986
Ø Bharat Speaks Out, 1985




SPORTS, CLUBS, FAVOURITE PASSTIMES AND RECREATIONTrekking and mountaineering; scaling peaks and going for long walks


COUNTRIES VISITEDSwitzerland as member of an Indian delegation to the Council of Universal Postal Union, 1956-57
U.S.A., Canada, Netherlands, Kenya, Thailand and Zambia as representative of the Universal Postal Union to attend meetings of Inter-Organization Administrative Committee of U. N. Specialized Institutions, 1961-68 and as member of Universal Postal Union Missions to various countries, 1968-77
Malaysia, as representative of Indian farmers' movement, 1988-89
U.S.A., as member of International Advisory Board, World Agriculture Forum and World Agriculture Congress, 1999 and 2001-03


EDUCATIONAL QUALIFICATIONS
M. Com., Sydenham College of Commerce & Economics, Mumbai
Diploma in Informatics, Lausanne, Switzerland


PERSONAL DETAILS
Father's Name: Shri Anantrao
Mother's Name: Shrimati Indirabai
Date of Birth: 3 September, 1935
Place of Birth: Distt. Satara (Maharashtra)
Marital Status: Married on 25 June, 1961
Spouse's Name: Late Shrimati Leela
Children: Two daughters
Permanent Address: Angarmala, Village Ambethan, Taluka Khed, District- Pune, Maharashtra. Tel. – (02135) 278721
Website: <http://www.shetkari.in/>
E-mail : sharadjoshi.mah@gmail.com

Thursday, 20 December 2012

जग बदलणारी पुस्तके


जग बदलणारी पुस्तके

.
>
.

.
.
पीडीएफ़ फ़ाईल डाऊनलोड करून वाचण्यासाठी
येथे
किंवा चित्रावर क्लिक करा.
.
.
.
.
-----------------------------------------------------------------------------------------------------

ऑनलाईन वाचण्यासाठी पानावर क्लिक करा. 
पाने पलटण्यासाठी पानाच्या काठावर क्लिक करा. 
नेट स्लो असेल तर पाने दिसायला थोडा वेळ लागू शकतो. प्रतिक्षा करा. 
* * * * 



* * * * 
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभार.
आपणास हा ब्लॉग असा वाटला या बद्दल अभिप्राय किंवा सुचना खालील चौकटीत लिहा.
आपले विचार आणि सुचना या ब्लॉगच्या जडणघडणीसाठी महत्वाच्या ठरू शकतात.
म्हणून

आपला प्रतिसाद अवश्य लिहा
     Rameshwar Awchar
   Email         Ruawchar@rediffmail.com

   Blog          bhaliraja.blogspot.com
  Mob. No      91-9960333437

Thursday, 13 December 2012

शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा

शेतकरी संघटना काय आहे?

स्टार माझा वेब टीम, मुंबई

Saturday, 12 November 2011
मुंबई : ऊसाला 2350 रूपये भाव मिळावा यासाठी ज्या तीन संघटना गेल्या आठवड्याभरापेक्षा जास्त काळ आंदोलन करत होत्या ती खरी एकच संघटना आहे आणि ती म्हणजे शेतकरी संघटना. शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची स्थापना आणि उभारणी केली ती १९८० च्या काळात. यूनोतली बड्या हुद्यावरची नोकरी सोडून जोशी भारतात परतले आणि २२ एकर कोरडवाहू जमीन घेऊन शेती करू लागले. त्यात त्यांना आलेल्या अनुभवातून जोशींनी शेतीचं अर्थशास्त्र नव्यानं मांडलं.
उत्पादन खर्चावर आधारीत किंमत शेतकऱ्यांना मिळाली तर त्यांची गरीबीतून सुटका होईल आणि तोट्यातली शेती शेतकऱ्यांच्या नशीबानं नाही तर सरकारच्या धोरणानं असल्याचं जोशींनी शास्त्रशुद्द पद्धतीनं मांडलं. जे शेतकऱ्यांनाही पटलं.
शेतकरी संघटनेनं कुठली आंदोलनं लढली?
सरकारकडे कायम अनुदान मागणाऱ्या शेतकऱ्यांना जोशींनी भीक नको घेऊ घामाचे दाम, शेतकरी तितुका एक एक असा नवा मुलमंत्र दिला आणि महाराष्ट्रात 80 च्या दशकात शेतकऱ्यांचा आगडोंब रस्त्यावर आला. 1980 मध्ये शरद जोशींनी पहिलं कांद्याचं आंदोलन केलं ते चाकन परिसरात. त्याला शेतकऱ्यांचा अभूतपुर्व प्रतिसाद मिळाला. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये नाशिक जिल्ह्यातच जोशींच्या नेतृत्वाखाली ऊसाचं आंदोलन पेटलं. शेतकरी पुन्हा रस्त्यावर आले.
सरकारनं शेतकऱ्यांवर गोळीबार केला. तीन शेतकरी मारले गेले. लातूर जिल्ह्यातल्या पानगावमधल्या आंदोलनातही एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागला. जोशींच्या नव्या आर्थिक विचारानं शेतकऱ्यांमध्ये जागृती यायला लागली. निपाणीत परत वर्षभरातच तंबाखुचं आंदोलन झालं. त्यालाही तेवढाच प्रतिसाद मिळाला. ऊस, कांदा, तंबाखु यांच्या आंदोलनानंतर जोशींनी कापसाचा प्रश्न हाती घेतला. ठिकठिकाणी त्यांनी नव्यानं उत्पादन खर्चावर आधारीत किंमतीची नव्यानं मांडणी केली.
१९८६ मध्ये विदर्भ मराठवाड्यात कापसाच्या प्रश्नावर आंदोलन झालं. पुन्हा शेतकरी जोशींच्या हाकेला ओ देत रस्त्यावर उतरले. सरकारनं आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. हिंगोली जिल्ह्यातल्या सुरेगावमध्ये तीन शेतकऱ्यांना पोलिसांच्या गोळीबारात प्राण गमवावे लागले. फक्त शेतीच नाही तर चांदवडला शेतकरी संघटनेचं महिला अधिवेशन झालं आणि त्यात पहिल्यांदाच महिलांच्या प्रश्नावर आधारीत जोशींनी मांडणी केली जी संघटनेसाठी टर्निंग पॉईंट ठरली.
शेतकरी संघटनेनं कुठले राजकीय नेते दिले?
शरद जोशींचे विचार हे चळवळीचे आहेत त्यातून शेतकरी संघटना ही चळवळ म्हणून उदयाला आली. एक सशक्त दबावगट म्हणून तिला मोठं यश मिळालं. पण राजकारणात जाणार नाही म्हणणाऱ्या शरद जोशींनी निवडणुकीच्या मैदानातही उडी मारली आणि इथूनच संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. विशेष म्हणजे १९९० च्या विधानसभा निवडणुकीत एक नाही दोन नाही तर चक्क पाच आमदार शेतकऱी संघटनेचे निवडून आले. पण चळवळ आणि राजकारण यांचा मेळ घालता आला नाही. परिणामी ९५ च्या निवडणुकीत दोनच आमदार राहिले.
काही जणांनी संघटनेतून बाहेरपडून वेगळी राजकीय चूल मांडली आणि राजकीय पदं भूषवली. त्यात मग अनिल गोटे, आर एम वाणी, शंकर धोंडगे, पाशा पटेल आणि आताचे राजू शेट्टी त्यापैकीच एक. सद्यस्थितीत शेतकरी संघटना तीन गटात विभागली गेलीय. पण तिघांचाही आत्मा एकच आहे आणि तो म्हणजे शरद जोशींनी वेळोवेळी केलेली आर्थिक मांडणी. त्याच मांडणीवर मग राजू शेट्टी कधी उस उत्पादकांचं आंदोलन यशस्वी करतात तर कधी रघुनाथदादा पाटील सांगलीत धुमाकुळ घालतात.
विदर्भात वामनराव चटप कापसाचं आंदोलन करतात तर मराठवाड्यात एखादा साधा बिल्ला लावलेला कार्यकर्ताही आर्थिक धोरणावर पद्धतशीर बोलतो. दुर्देवं एवढच की विचार एक असतानाही संघटना मात्र एक राहू शकली नाही.
------------------------------------------------------------------------------------------------------------स्टार माझावर
काल १२ नोव्हेबर २०११ ला स्टार माझावर प्रसारीत झालेला विशेष कार्यक्रम   

उषःकाल होता होता

उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

अम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी !
अम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दु:खाचीही चालली दलाली !

उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे!
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली !

                                - सुरेश भट      आता उठवू सारे रान
आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण

किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल हे रान

कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील
अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण
शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेऊन गाती स्वातंत्र्याचे गान

पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन्‌ कामकरी मांडणार हो ठाण

                                       - साने गुरुजी---------------------------------------------

डोंगरी शेत माझं गं

डोंगरी शेत माझं गं मी बेनू किती?
आलं वरिस राबून मी मरावं किती?
कवळाचे भारे बाई गं घेऊन चढावं किती?
आडाचं पाणी बाई गं पाणी वढावं किती?
घरात तान्हा माझा गं तान्हा रडंल किती?
तान्ह्याचं रडं ऐकून
पान्हा येईल किती?
आलं आलं वरीस जमिन नांगरुन
उभं पीक नाचे सोन्यानं फुलून
पर एक मेला सावकार ठोला
हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा
असं उपाशी राहून
आम्ही मरावं किती?
या संसारा बाई सांजी येईना
रक्त गाळून अंगा धडूत मिळंना
कष्टाचं फळ बाई पदरात पडंना
टीचभर पोटाला,
हातभर देहाला जपावं किती?
अक्षय ऱ्हाया कुंकू कपाळा
संसार वेलीच्या फुलवाया फुला
रुप नवं आणू माय धरतीला
तोडू जुलमाचे काच, हे रावणी फास
एकीचं निशाण हाती
- नारायण सुर्वे
---------------------------------------

शेतकरी-पोलिसांची धक्काबुक्की! Rameshwar Awchar


दि. 9 (प्रतिनिधी, पुण्यनगरी)

केंद्राने कापसाला 20 टक्के हमीभाव वाढवून द्यावा किंवा राज्य शासनाने 20 टक्के बोनस द्यावा, धानाला 3 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यासह विविध मागण्यांकरिता शेतकरी संघटनेने रविवारी ...
रिझर्व्ह बँक क्वॉर्टर चौकात आंदोलन केले. मुख्यमंर्त्यांनी आंदोलकांना भेटायला वेळ न दिल्याने शेतकरी संतप्त होत अचानक रामगिरीवर निघाले. दोन ठिकाणी पोलिसांनी शेतकर्‍यांना अडविल्यावर ते बॅरिकेट्स पाडून पुढे निघाल्याने शेतकरी-पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली.

शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी दुपारपासून रिझर्व्ह बँक क्वॉर्टर चौकात ठिय्या आंदोलन सुरू झाले. आंदोलनात विदर्भाच्या वेगवेगळय़ा भागासह मराठवाडय़ातून मोठय़ा संख्येने शेतकरी सहभागी झाले. आंदोलकांनी याप्रसंगी केंद्र सरकारने कापसाच्या आधारभूत किमतीत 20 टक्के दरवाढ किंवा राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या न्यायाकरिता 20 टक्के कापसावर बोनस द्यावा, धान उत्पादकांना 3 हजार प्रतिक्विंटल दर द्यावा, शेतकर्‍यांना 24 तास वीज द्यावी, शेतकर्‍यांचे वीज बिल आणि कर्जमाफी देण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
दरम्यान मुख्यमंर्त्यांना शेतकर्‍यांच्या गंभीर प्रश्नावर चर्चा करण्याकरिता शेतकरी संघटनेने वेळ मागितली होती. मुख्यमंर्त्यांनी संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत आंदोलकांना भेटण्याकरिता वेळ दिली नसल्याने आंदोलक भडकले. आंदोलकांनी शेतकरी संघटनेचे नेते माजी आ. वामनराव चटप, राम नेवले, जगदीश बोंडे, नाना खांदवे, रवी देवांग, सरोज काशीकरसह अनेक मान्यवरांच्या नेतृत्वात अचानक थेट मुख्यमंत्री निवासस्थान रामगिरीवर कूच सुरू केली. अचानक आंदोलक रामगिरीवर निघाल्याने पोलिसांचे धाबे दणाणले. शांत बसलेल्या पोलिसांनी धावपळ करीत बंदोबस्त वाढवायला सुरुवात केली.आंदोलकांनी सुरुवातीला आमदार निवासात घुसण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी तो हाणून पाडला. शेतकर्‍यांनी मग रामगिरीकडे जाणारा मार्ग धरला.

पोलिसांनी बॅरिकेट्स व मोठय़ा प्रमाणावर पोलीस कर्मचारी लावून आंदोलकांना आमदार निवास चौकाच्या बाजूला अडविण्याचा प्रयत्न केला; परंतु संतप्त शेतकर्‍यांसह वामनराव चटप यांनी स्वत: बॅरिकेट्स पाडत पुढे धाव घेतली. शेतकरी बॅरिकेट्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून शेतकरी-पोलिसांमध्ये थोडी धक्काबुक्की झाली. याप्रसंगी तणाव निर्माण झाला होता. शेतकरी अचानक रामगिरीच्या दिशेने धावत सुटल्याने पोलीसही त्यांना अडविण्याकरिता मागे धावत होते. शेवटी पोलिसांनी लेडीज क्लब ग्राऊंडच्या पुढे तातडीने लाकडी व लोखंडी बॅरिकेट्स लावून शेतकर्‍यांना रोखले. शेतकर्‍यांनी बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला असता येथेही पोलीस-आंदोलकांत धक्काबुक्की झाली. सुदैवाने पोलिसांनी नमते घेतल्याने लाठीचार्ज टळला. शेतकरी संघटनेने लेडीज क्लब ग्राऊंडच्या पुढेच मग ठिय्या आंदोलन करीत मुख्यमंर्त्यांना भेटल्यावर व त्यांनी मागण्या पूर्ण केल्यावरच आंदोलन परत घेण्याची घोषणा केली.
तणाव वाढत असल्याने पोलीस अधिकार्‍यांनी मध्यस्थी करीत मुख्यमंर्त्यांची वेळ घेऊन देण्याकरिता प्रयत्न सुरू केले. दरम्यान शासनाच्या विरोधात संतप्त शेतकर्‍यांनी जोरदार निदर्शने केली. मुख्यमंर्त्यांनी शेवटी संघटनेच्या शिष्टमंडळाशी भेटण्याचे आश्वासन दिल्याने 17 सदस्यीय शिष्टमंडळ संध्याकाळी 7 च्या सुमारास रामगिरीवर पोहोचले. शिष्टमंडळात वामनराव चटप, राम नेवले, जगदीश बोंडे, नाना खांदवे, रवी देवांग, सरोज काशीकर, गंगाधर मुटे, विजय निवल, प्रभाकर दिवे, संध्या राऊत आदींचा सहभाग होता.
शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौव्हाण यांच्यासोबत सुमारे ३० मिनिटे चर्चा केली. चर्चेत मुख्यमंर्त्यांनी शिष्टमंडळाला राज्य शासन केंद्र सरकारला कापसाची आधारभूत किंमत 20 टक्के वाढवा, गव्हाला प्रती क्विंटल 130 रुपये बोनस द्या, सी. रंगराजन समितीच्या शिफारशी लागू करण्यासह विविध मागण्यांकरिता पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. विजेच्या मुद्यावरही अधिवेशनाच्या आधी बोलणे योग्य नसल्याने योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंर्त्यांनी दिल्याची माहिती शेतकरी नेते वामनराव चटप यांनी दिली. चर्चेत कापसाला 4,680 रुपये प्रतिक्विंटल दर धानाला 3,000 रुपये प्रतिक्विंटल दर विविध कारणांनी कापूस, सोयाबीन, धानपीक न झालेल्या शेतकर्‍यांना हेक्टरी 10 हजार रोख द्या, शेतकर्‍यांचे कर्ज आणि वीजबिल माफ करा, कृषिपंपाची वीज खंडित करणे बंद करा, ऊस उत्पादकांकरिता महत्त्वाच्या असलेल्या सी. रंगराजन समितीच्या शिफारशी मंजूर करा, गव्हावर 130 रुपये प्रतिक्विंटल बोनस द्या, शेतकर्‍यांना बाजारपेठ आणि तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य द्या. या मागण्यांचा समावेश होता.

Monday, 3 December 2012

शेतकरी संघटना: अंगारमळा - आत्मचरित्र

शेतकरी संघटना: अंगारमळा - आत्मचरित्र: अंगारमळा - आत्मचरित्र वाचण्यासाठी पानावर क्लिक करा. पाने पलटण्यासाठी पानाच्या काठावर क्लिक करा. नेट स्लो असेल तर पाने दिसायला थोडा...