Monday, 25 February 2013

देशातील शेतकरी कर्जमुक्‍त होईपर्यंत आपण डोळे मिटणार नाही -शरद जोशी

देशातील शेतकरी कर्जमुक्‍त होईपर्यंत आपण डोळे मिटणार नाही -शरद जोशी


या देशातील शेतकरी कर्जमुक्‍त होईपर्यंत आपण डोळे मिटणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आपण लढतच राहणार, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी येथे केले. लातूर- ज्ञानश्री प्रतिष्ठानच्या वतीने स्व. निवृत्तीराव मोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा "ज्ञानाई पुरस्कार' शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांना जाहीर झाला आहे. ए...क लाख रुपये, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आज (रविवारी) सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या हस्ते अंबाजोगाई येथील मुकुंदराज सभागृहात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्व. निवृत्तीराव मोरे आणि त्यांच्या पत्नी ज्ञानुबाई मोरे यांनी मराठवाड्यात शेतकरी संघटनेचे प्रभावी काम केले आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये न्याय्य हक्कांसाठी अभूतपूर्व क्रांती करणाऱ्या आणि शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळण्यासाठी लढा देत असलेल्या शरद जोशी यांची निवड करण्यात आल्याचे श्रीरंगराव मोरे यांनी सांगितले आहे.
Sunday, December 23, 2012 AT 12:30 AM (IST)

No comments:

Post a Comment