Saturday, 30 March 2013

शरद जोशी यांचा कार्यकर्त्यांना आदेश

शेतकरी नेते शरद जोशी यांचं परखड मत

नांदेड: राज्यातील दुष्काळ हटवायचा असेल, तर ऊस हद्दपार करा, असं आवाहन शेतकरी नेते शरद जोशी यांनी केलं. मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या जोशी यांनी दुष्काळाबाबत ही मागणी केली.

“राज्यातील आणि मराठवाड्यातील दुष्काळाला उसाचे पीक कारणीभूत आहे. तसंच वसाहतवादी कारखानदार आणि राजकारणी यांच्यामुळेच मराठवाड्यावर दुष्काळाची वेळ आली आहे”, अशी टीका शरद जोशी यांनी केली.

साखर कारखाने आणि उसाची शेती, साखर कारखानदार आणि राजकारणी यांच्यातला हा वसाहतवाद आहे. तुमच्याकडे उसाची शेती जर ड्रिप इरिगेशनवर नसेल तर ती उखडून टाका आणि ऊस लावला नसेल तर तो सध्या लावूही नका, कारण उसाची शेती हीच दुष्काळाला मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे, असं परखड मत जोशी यांनी व्यक्त केलं.
मराठवाड्यात येणाऱ्या सर्व नद्या पश्‍चिम घाटातील आहेत. त्यातील पाणी पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरी उपसा करीत आहेत. याशिवाय उसाची शेती आणि साखर कारखाने आदी कारणांमुळे दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते शरदजोशी यांनी केली.

श्री. जोशी म्हणाले,"पश्‍चिम घाटातील पाणी इकडे येता येता शेतकरी पाइप टाकून उपसून घेतात. त्यामुळे जमिनीत पाणी अजिबात मुरत नाही. मराठवाड्यात पाणी मुरण्याचे प्रमाण अत्यंत कमी होत आहे. त्यामुळे ज्या बागा, शेती जमिनीच्या पाण्यावर अवलंबून होत्या, त्याच्यावर मोठे संकट आलेले आहे. मराठवाड्यात उसाची शेती, साखरेचे कारखाने पाहता दुष्काळाचा, पाण्याचा प्रश्‍न सोडविणे फार कठीणआहे.''

सूक्ष्म सिंचन वापर नसलेल्या
शेतकर्‍यांचा ऊस पेटवून द्या
शरद जोशी यांचा कार्यकर्त्यांना आदेश
हिंगोली। दि. २९ (प्रतिनिधी)
पाण्याचे आधीच दुर्भिक्ष्य असलेल्या दक्षिण मराठवाड्यात मोठय़ा प्रमाणात उसाची शेती केली जात असून जमिनीत पाणी मुरू दिले नाही म्हणून दुष्काळ निर्माण झाला आहे. हे संकट दूर करण्यासाठी जिथे-जिथे सूक्ष्म सिंचन पद्धती न वापरता उसाचे पीक घेण्यात आले आहे त्या ठिकाणचा ऊस पेटवून द्या, असे आदेश शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद जोशी यांनी हिंगोली येथे कार्यकर्त्यांना दिले आहेत.
नवा मोंढा भागात आयोजित दुष्काळी परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याच कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्ते ब.ल.तामसकर यांचा एकसष्टीनिमित्त संघटनेतर्फे शरद जोशी यांच्या हस्ते १ लाखाचा धनादेश देऊन विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी o्रीरंगराव मोरे, डॉ.व.द. भाले, वामनराव चटप, माजी आ.सरोज काशीकर, भास्करराव बोरावके, प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब, मानवेंद्र काचोळे, गोविंद जोशी, हेमा रसाळ, डॉ. रवींद्र रसाळ, गुणवंत पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठवाड्यातील साखर कारखाने व ऊस उत्पादक पाणी पळवत असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप करीत शरद जोशी यांनी पीक रचनेतील बदलासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले. पश्‍चिम महाराष्ट्रातील वसाहतवादी राजकारण मराठवाड्यावर लादले जात आहे. दक्षिण मराठवाड्यात सूक्ष्म सिंचन पद्धती न वापरता केली जाणारी उसाची शेती पेटवून देण्याचा आदेश कार्यकर्त्यांना देऊन या आंदोलनाची जबाबदारी ब.ल.तामसकर, नारायणराव जाधव यांच्याकडे सोपविल्याचे जोशी यांनी जाहीर केले.
     
संघर्षशील कार्यकर्त्याच्या प्रयत्नाने चळवळ जिवंत
- - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मार्च 2013 - 12:15 AM IST


हिंगोली - ""वैचारिक चळवळीसाठी रस्त्यावर लढणाऱ्या संघर्षशील कार्यकर्त्यांमुळे चळवळी जिवंत राहतात,'' असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी येथे व्यक्‍त केले. शेतकरी संघटनेचे जुन्या पिढीचे ज्येष्ठ कार्यकर्ते ब. ल. तामसकर यांच्या कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी (ता.29) करण्यात आले होते.
या वेळी श्री. जोशी म्हणाले की, ब. ल. तामसकर हे खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्त्यांचे अग्रणी राहिले. केवळ शेतकरी संघटना नव्हे तर नामांतराचे आंदोलन, ब्रॉडगेजचे आंदोलन अशा कितीतरी आंदोलनात त्यांनी त्यांच्यातील संघर्षशील कार्यकर्त्याचा परिचय घडविला. मराठवाड्यातील सामाजिक संघर्षाचा शिलेदार म्हणून त्यांचे नाव घ्यावे लागेल, मात्र चळवळ ही थांबत नाही म्हणून यापुढे त्यांना उत्तर महाराष्ट्रात ऊस बंदी आंदोलनात पुढाकार घ्यावा लागेल. त्याची जबाबदारी श्री. तामसकर, ऍड. प्रताप बांगर, नारायण जाधव यांच्यावर सोपवत आहोत.''
सत्काराला उत्तर देताना श्री. तामसकर म्हणाले, की लहानपणापासून राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारातून आपण घडलो. पुढे शेतकरी संघटना हाच आपला धर्म बनला. संघटनेचा पाईक म्हणून केवळ आदेश पाळण्याचे काम केले. मला प्रथम सत्याग्रहीचा मान मिळाला. संघटनेत अनेक लोक पुढे अन्य क्षेत्रात गेले, पण मला संघटना हीच जीवनश्रद्धा वाटते.''
या वेळी त्यांच्या गौरवासाठी श्री. जोशी यांच्यासह शेतकरी संघटनेचे अनंतराव उमरीकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. व. द. भाले, गोविंद जोशी, सरोज काशीकर, भास्करराव बोरावके, वामनराव चटप, सुरेश सोनी, रामराव जाधव, ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव, जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष शेषराव सोळंके, माजी आमदार पंडितराव देशमुख, दगडूजी गलंडे, गुलाबराव राठी, वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष ऍड. प्रताप बांगर, अंजली पातूरकर, नारायण जाधव, उत्तमराव वाबळे, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र रसाळ, अमर हबीब, पुरुषोत्तम लाहोटी यांच्यासह विविध क्षेत्रातील सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment