Sunday 7 April, 2013

गांधीजींनी "खेड्याकडे चला" हि हाक दिली होती

शिका,नोकरी-धंद्यांत पैसे मिळवा,मग खेड्याकडे चला व शेतीच्या माध्यमातून .... विकासाठी संघर्ष करा!

ज्यांनी शेतकरी कुटुंबात जन्म घेतला व आपल्या आईवडिलांना आपल्या ...बालपणापासून कष्ट करतांना आणि कष्टाने पिकविलेल्या मालाची बाजारात गेल्यावर उत्पादन खर्चही भरून न निघाल्याने दु:खी व कष्टी होतांना पहिले त्या शेतक-यांच्या मुलांनी शिकून वेगळ्या व्यवसायात, उद्योगात अथवा सेवा क्षेत्रात काम करून नाव व पैसा कमव...िला असेल तर त्यांनी आपल्या नावाचा , प्रतिष्ठेचा आणि पैशाचा उपयोग शहरातील बिनशेती भूखंड अथवा बांधीव मिळकती विकत घेवून त्या पुन्हा भाव वाढल्यावर विकून त्यातून नफा कमवून ऐतखाऊ न होता आपल्या जन्मदात्यांची व आपल्या जन्म्दात्यांच्याही जन्मदात्यांची आठवण ठेवून ते ज्या शेतकरी समाजात जन्माला आले त्या शेतीच्या व शेतकरी समाजाच्या उन्नत्तीसाठी तसेच्य खेड्यांच्या विकासासाठी शेती व्यतिरिक्त इतर क्षेत्रात कमविलेल्या पैशांचा उपयोग हा ग्रामीण भागातील शेतीच्या विकासासाठी करणे आवश्यक असून आपल्या ज्ञानाचा व नावलौकिकाचा उपयोग हा गरजू शेतक-यांच्या व शेतमजुरांच्या विकासासाठी करणे आवश्यक आहे.

आपल्याकडे अनेकांना झटपट श्रीमंत होण्याची अत्यंत घाई झालेली असून कोणत्याही मार्गाने पैसे मिळविणे हेच उद्दिष्ठ ठेवले जात आहे आणि त्यासाठी कोणतेही मार्ग वापरून पैसे कमविण्याचे प्रयत्न केले जातात आणि काहींकडे पैसे आलेकी राजकारण करून त्यातून पुन्हा पैसे व प्रशिद्दी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातात, हा गेल्या अनेक वर्षांचा बदलता इतिहास असून आजच्या अनेक राजकारण्यांकडे पहिले कि हि गोष्ट शिद्ध होते. यासाठी अनेकांचा वापर केला जातो. महाराष्ट्रात छत्रपति शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून व समाजात तेढ निर्माण करून मुंबईपासून ते राज्यातील खेड्यापाड्यांपर्यंत जेंव्हा राजकारण केले जात होते तेंव्हा द्देशात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकत्रित साजरी करण्याचा विचार मांडून तो कार्यक्रम मा. श्री शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेच्या जळगाव येथील सभेत प्रचंड मोठ्या जनसागरासमोर करून या दोन्ही महापुरुषांची महानता जगाला दाखवून दिली होती आणि त्यावेळी या घटनेची फक्त देशातीलच नव्हे तर जागतिक पातळीवरील माध्यमांनी दखल घेतली होती.या घटनेचा मीही जळगावात साक्षीदार होतो.

गांधीजींनी "खेड्याकडे चला" हि हाक दिली होती तर डॉक्टर बाबासाहेबांनी "शिका, संघटीत व्हा,व संघर्ष करा" हा मंत्र दिला होता. मी माझ्या परीने हे दोन्ही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

गांधीजींचा "खेड्याकडे चला" व डॉक्टर बाबासाहेबांचा "शिका, संघटीत व्हा, व संघर्ष करा" हा मंत्र आपल्या देशातील कोट्यावधी शेतक-यांच्या शिकलेल्या मुलांनी आचरणात आणल्यास ख-या अर्थाने आपल्या देशाच्या विकासाला हातभार लागेल व हीच खरी देशसेवा व समाजसेवा असेल आणि तेच ख-या अर्थाने या देशातील अनेक महापुरुषांना तसेच आपपल्या आईवडिलांना व पूर्वजांना अभिवादन असेल, असे मला वाटते.

1 comment: