शरद जोशी यांना पहिला ज्ञानश्री पुरस्कार
अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी इथल्या ज्ञानश्री प्रतिष्ठाणच्या वतीन देण्यात येणारा ज्ञानश्री पुरस्कार शेतकरी संघटनेचे नेते , माजी खासदार शरद जोशी यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीरंगराव मोरे आणि डॉ. शेषराव माहिते यांनी ही घोषणा केली.
शेतकरी संघटनेच्या कामात श्रीरंगराव मोरे आणि त्यांच्या पत्नी दिवंगत ज्ञानुबाई यांनी प्रदीर्घ काळ काम केले आहे. ज्ञानुबाई यांच्या निधना नंतर मोरे परिवारानी ज्ञानश्री प्रतिष्ठाणची स्थापना केली आहे. या प्रतिष्ठाणच्या वतीन श्रीरंगराव मोरे यांचे वडील दिवंगत निवृत्तीराव मोरे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढे उभारणारे कार्यकर्ते , वारकरी सांप्रदायातील महानीय व्यक्ती , आणि शेतकऱ्यांच्या जीवनासंबंधी साहित्यातून दर्जेदार लिखाण करणाऱ्यापैकी एका व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप रोख एक लाख रुपये , स्मृतीचिन्ह , शाल श्रीफळ असे असेल.
शेतीमालाला उत्पादनावर आधारीत भाव मिळाला पाहिजे , यासाठी शरद जोशी यांनी केलेली जागृती अभूतपूर्व क्रांती आहे , त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे , असे या प्रतिष्ठानच्या पत्रकामध्ये म्हटडले आहे.
पहिला ज्ञानश्री पुरस्कार २३ डिसेंबरला अंबाजोगाई येथे ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या हस्ते दिला जाणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ग्रामिण साहित्यीक भास्कर चंदनशिव उपस्थित राहणार आहेत.
रावेरी - सीता मंदीर
रावेरी - सीतामंदीर
रावेरी, त.राळेगाव जि. यवतमाळ येथे भुमीकन्या सीतामाईचे मंदीर असून हे सीतामाईचे देशातले एकमेव मंदीर आहे.
प्रभूरामचंद्राने सीतामाईचा त्याग केल्यानंतर याच दंडकारण्यात सीतामाईचे वास्तव्य होते.
प्रभूरामचंद्राने सीतामाईचा त्याग केल्यानंतर याच दंडकारण्यात सीतामाईचे वास्तव्य होते.
अयोध्यास्थित राममंदीरासाठी संपूर्ण देशात रामायण-महाभारत घडत असताना रावेरीचे सीतामाईचे एकमेव मंदीर जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे, याकडे कुणाचे लक्षही नव्हते. काही वर्षापूर्वी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीने या मंदीराच्या जिर्णोध्दाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि मंदीराचे काम पूर्ण केले.
या मंदीराच्या जिर्णोध्दारासाठी शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांनी सिंहाचा वाटा उचलला आणि मंदीराच्या जिर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध झाला.
मंदीराचे काम जवळ-जवळ पूर्ण झाले आहे.
दि. १५ नोव्हेंबर २०१० रोजी मा. शरद जोशीं यांनी रावेरी येथील सीतामंदीरास भेट देवून पाहणी केली.
त्यांच्यासोबत मा. रवीभाऊ देवांग, मा. वामनराव चटप, सरोजताई काशीकर, शैलाताई देशपांडे, गुणवंतराव पाटील, कैलासजी तंवर, रमेश पाटील, नितीन देशमुख, रमेश देशमुख,आदी उपस्थित होते.
त्यांच्यासोबत मा. रवीभाऊ देवांग, मा. वामनराव चटप, सरोजताई काशीकर, शैलाताई देशपांडे, गुणवंतराव पाटील, कैलासजी तंवर, रमेश पाटील, नितीन देशमुख, रमेश देशमुख,आदी उपस्थित होते.
या विषयावर यथावकाश संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आहे.
* * * *
शेतकरी संघटनेचे पुण्यात धरणे आंदोलन सुरू
- (प्रतिनिधी)
Thursday, November 08, 2012 AT 02:00 AM (IST)
पुणे - डॉ. सी. रंगराजन समितीच्या शिफारशी लागू करून साखर उद्योग नियंत्रणमुक्त करावा, या मागणीसाठी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने येथील साखर आयुक्तालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. संघटनेच्या राज्यभरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी साखर आयुक्तालयासमोर ठिय्या मारला असून, शासनाने दखल न घेतल्यास गावोगाव उग्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, पुणे जिल्हाध्यक्ष आबा ताकवले, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामनराव चटप, अनिल चव्हाण, विक्रम शेळके, मेहमूद पटेल, अनिल घनवट, सौ. जयश्री गद्रे यांच्यासह संघटनेच्या सुमारे 50 कार्यकर्त्यांनी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारातच ठिय्या मारला आहे. गुरुवारी (ता.8) धरणे आंदोलन सुरू राहणार आहे.
रंगराजन समितीने केलेल्या शिफारशींमध्ये लेव्ही साखरेचा कोटा संपुष्टात आणावा. कारखान्यांना कार्यक्षेत्राची अट नसावी. साखर आणि उप-उत्पादनांच्या 70 टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी. साखर निर्यातीवरील बंधने उठवावीत आदी शिफारशींचा समावेश आहे. या शिफारशींमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळणार असल्याने त्यांची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी संघटनेची मागणी आहे.
श्री. देवांग म्हणाले, ""यंदाच्या हंगामात पुणे व नगर जिल्ह्यांत 3100 रुपये प्रति टन व उर्वरित महाराष्ट्रासाठी 3900 रुपये प्रति टन पहिली उचल मिळावी. गेल्या वर्षी 41 कारखान्यांनी ठरलेल्या दराहून कमी उचल दिली आहे. या कारखान्यांकडून फरकाची रक्कम वसूल करावी व गेल्या वर्षीची अंतिम बिले द्यावीत, या संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत. सर्व मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहील.''
इच्छुक साखर कारखान्यांवर दबाव
नगर व कोल्हापूरमधील काही साखर कारखाने प्रतिटन तीन हजार रुपयांहून अधिक पहिली उचल देण्यास तयार आहेत. मात्र त्यांच्यावर शेजारच्या जिल्ह्यांतील साखर कारखान्यांकडून प्रचंड दबाव टाकला जात आहे. यामुळे क्षमता व इच्छा असूनही हे कारखाने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दर देऊ शकलेले नाहीत, असा दावा श्री. देवांग यांनी केला.