Tuesday, 9 October 2012

एफडीआय संपवणार बाजार समित्यांची दादागिरीः शरद जोशी

एफडीआय संपवणार बाजार समित्यांची दादागिरीः शरद जोशी

अशोक अडसूळ | Sep 20, 2012, 07:48AM IST


मुंबई- रिटेलमधील परदेशी गुंतवणुकीमुळे देशातील एकही किराणा दुकान बंद पडणार नाही. उलट सुपर मार्केटमुळे सुविधांची साखळी उभी राहिल्याने ग्राहकांना ताजा माल स्वस्तात मिळेल. तसेच शेतक-यांची कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या जाचातून सुटका होईल, असे सांगत शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी रिटेलमधील विदेशी गुंतवणुकीचे स्वागत केले.  मनमोहनसिंग यांच्या संपुआसरकारनेरिटेलमध्ये 51 टक्के विदेशी गुंतवणुकीस नुकतीच परवानगी दिली आहे. त्यास रालोआ आणि डाव्या पक्षांनी तीव्र आक्षेप घेत गुरुवारी भारत बंदचा नारा दिला आहे.   याबाबत शरद जोशी म्हणाले की, ‘रिटेलमधील विदेशी गुंतवणुकीची आद्य प्रवर्तक शेतकरी संघटना आहे. वाजपेयी सरकारपासून आम्ही विदेशी गुंतवणुकीचा मुद्दा लावून धरला आहे. सुपर मार्केटमुळे किराणा दुकाने बंद पडतील हा गैरसमज आहे. उलट सुपर मार्केटच्या नव्या व्यवस्थेत उच्च कौशल्याचे अगणित रोजगार निर्माण होतील.   भाजप नेते वैचारिकदृष्ट्या मागास  एक ब्रँड असणा-या विदेशी कंपन्या आपल्याला चालतात, मग मल्टी ब्रँड कंपन्यांना विरोध का? असा सवाल उपस्थित करत जोशी म्हणाले की, भाजपमधील काही नेते वैचारिकदृष्ट्या मागास आहेत. ते एफडीआयला विरोध करत आहेत. खुद्द वाजपेयी एफडीआयच्या बाजूचे होते. रालोआकडून होणारा विरोध दुर्दैवी असल्याचे जोशी यांनी नमूद केले.  दलालांची साखळी संपुष्टात येईल 
देशात रिलायन्ससारखे मॉल आहेत, पण त्यांच्याकडे सुविधांची साखळी नाही. मल्टी ब्रँड कंपन्या त्यांच्या सोयीसाठी कोल्ड स्टोरेज, कोल्ड ट्रान्सपोर्टच्या व्यवस्था उभारतील. त्यामुळे नाशवंत पदार्थांच्या विक्रीवरील मर्यादा संपतील. ग्राहकांना उत्तम माल स्वस्तात पुरवणारी बाजारपेठ उभी राहील. शेतमालाची वाहतूक, साठवण, पारदर्शक विक्री व्यवस्था उभी करण्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या अपयशी ठरल्या आहेत. सुपर मार्केट बांधावर जाऊन माल खरेदी करतील. त्यामुळे दलालांचे उच्चाटन होईल तसेच शेतक-यांची कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कचाट्यातून काही प्रमाणात सुटका होईल, असे जोशी यांनी सांगितले.
शेतकरी प्रकाशन
=======================
शेतकरी संघटनेचे मुखपत्र
पाक्षिक
शेतकरी संघटक
संपादक - सुरेशचंद्र म्हात्रे
कार्यकारी संपादक-श्रीकांत उमरीकर
वार्षिक वर्गणी - रु. २००/- फ़क्त
पत्ता- शेतकरी संघटक
जनशक्ती वाचक चळवळ
२४४-समर्थनगर,
औरंगाबाद-४३१००१-३१
E-Mail :- shetkarisanghatak@gmail.com
=======================

No comments:

Post a Comment